नवाकाळ चषक

"नवाकाळ"चे कार्यकारी संपादक असलेल्या श्री रोहित रमाकांत पांडे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या दै . नवाकाळ चषक अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा २०१० पासून सुरु करण्यात आली.

गतवर्षी हि स्पर्धा  २२ ऑक्टोबर २०१० ते ३१ ऑक्टोबर २०१० दरम्यान लोअर परेल येथील श्रमिक जिमखाना मैदानात भरविण्यात आली होती.या स्पर्धेचे उतकृष्ट संयोजन नवाकाळचे वितरण व्यवस्थापक यशवंत मोर्ये आणि त्यांचे सहकारी यांनी केले. कोकणासह मुंबईतले एकूण ६४ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. पैकी प्रथम पारितोषिक रुपये १,००,०००/- शिवशक्ती प्रतिष्ठान लोअर  परेल , द्वितीय पारितोषिक रुपये ५०,०००/- असल्फा ताडदेव व तृतीय पारितोषिक रुपये २५,०००/- दीपक इलेव्हन यांनी जिंकले.

गतवर्षीप्रमाणेच दै . नवाकाळने याही वर्षी दै . नवाकाळ चषक अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा  ८ डिसेंबर २०११ ते १६ डिसेंबर २०११ या कालावधीत लोअर  परेल  येथील श्रमिक जिमखाना मैदानात भरविण्यात आली या स्पर्धेस बँक ऑफ इंडिया हे पुरस्कर्ते लाभले तसेच रॉयाल पान मसाला, सम्यक निवास हक्क प्रायोजित भीम फाउन्डेशनसाई भूमी लँन्ड इन्फ्रा स्ट्रकचर प्रा. लि. हे सह प्रायोजक म्हणून लाभले . याही वर्षी या स्पर्धेचे संयोजन नवाकाळचे वितरण व्यवस्थापक यशवंत मोर्ये आणि त्यांचे सहकारी  यांनी केले. कोकणासह मुंबईतले एकूण ६४ संघ या स्पर्धेत सहभागी झाले. 

या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी तसेच पारितोषिक वितरणासाठी म न से अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे व म न से आमदार  बाळा नांदगावकर  तसेच बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी झोनल मँनेजर मुंबई साऊथ झोन एन बी अगरवाल उपस्थित होते

अंतिम सामना ओमकार संघ मालाड आणि असल्फा संघ घाटकोपर यांच्यात झाला. ओमकार संघाने हा सामना जिंकून प्रथम पारितोषिक रुपये २,००,०००/- मिळविले तर असल्फा संघास रुपये १,००,०००/- चे द्वितीय पारितोषिक मिळाले. तृतीय  पारितोषिक रुपये ५०,०००/- अनिकेत संघ ग्रांटरोड यांनी  पटकावले. 

अंतिम सामन्याचा  सामनावीर रुपये १,०००/- हा पुरस्कार ओमकार संघाच्या बिपीन याने पटकावला तर स्पर्धेचा मालिकावीर रुपये २५,०००/- हा पुरस्कार  असल्फा संघाच्या घनश्याम शिंदे याने पटकावला. स्पर्धेचा  सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार रुपये १५,०००/-  हा  सुद्धा असल्फा संघाच्या घनश्याम शिंदे याने मिळविला तर संपूर्ण स्पर्धेत १६ फलंदाज बाद करणाऱ्या ओमकार संघाचा  शैलेश खेडेकर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज रुपये १५,०००/-  या पुरस्काराचा मानकरी ठरला   .   

Share

सामाजिक सहभाग